Pune : साडेतीन वर्षांत ‘दिल्ली-मुंबई हायवे’चे काम पूर्ण होणार -नितीन गडकरी

एमपीसी न्यूज – येत्या साडे तीन वर्षांत दिल्ली-मुंबई हायवेचे काम पूर्ण होणार असून त्यामुळे केवळ १४ तासांत अंतर पार करता येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशात आणखीन तीन हायवे बनविण्यात येत असून, 22 ग्रीन हायवेंचे काम प्रगतीपथावर असल्याचेही गडकरी म्हणाले.

पुणे आणि मुंबईसारख्या शहरात उद्योग आणि व्यवसायांचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. यामुळे खूप मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे या शहरांच्या बाहेरही उद्योग व्यवसाय जाण्याची गरज आहे, असल्याचे गडकरी यांनी निक्षून सांगितले.

देशभरातील उद्योग व्यवसायांसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात असल्याची माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलं की, ‘अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?,” असा किस्सा नितीन गडकरी यांनी सांगताच सभागृहात उपस्थित नागरिकांना हसू आवरता आले नाही. तर, बांबूपासून तेल मिळत असल्याने या व्यवसायाला चालना देण्यात येणार आहे, असेही गडकरी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.