Pune Market yard Update: मागणी घटली, सर्व भाज्यांचे दर स्थिर

Pune: Demand declines, prices of all vegetables stabilize in pune market yard हॉटेल, खानावळी काही भागांतील किरकोळ बाजार बंद आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे.

एमपीसी न्यूज- पुण्यातील मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्या इतकीच आहे. हॉटेल, खानावळी काही भागांतील किरकोळ बाजार बंद आहे. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत कमी मागणी आहे. सर्व प्रकारच्या भाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे, असे व्यापारी विलास भुजबळ यांनी रविवारी सांगितले.

रविवारी बाजारात 90 ते 100 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात व कर्नाटक येथून कोबी 3 टेम्पो, कर्नाटक येथून 2 टेम्पो घेवडा, हिमाचल प्रदेश येथून 5 टेम्पो मटार, इंदूर येथून 10 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून 200 गोणी तोतापुरी, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून लसणाची सात ते आठ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून सातारी आले 500 ते 600 पोती, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, कोबी 3 ते 4 टेम्पो, फ्लॉवर 5 ते 6 टेम्पो, भुईमूग 100 ते 125 पोती, ढोबळी मिरची 7 ते 8 टेम्पो, कांदा 45 ते 50 ट्रक, आग्रा येथून 27 ट्रक व इंदूर येथून 6 टेम्पो बटाट्याची आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव: कांदा: 70-90, बटाटा : 200-230, लसूण : 500-800, आले : 250-400, भेंडी : 100-150, गवार : 150-250, टोमॅटो : 150-200, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 180-300, दुधी भोपळा : 100-120, चवळी : 100-150, काकडी : 100-150, कारली : हिरवी 200-250, पांढरी 180-200, पापडी : 100-120, पडवळ : 200-250, फ्लॉवर : 100-140, कोबी : 70-80, वांगी : 100-200, डिंगरी : 100-140, नवलकोल : 60-80, ढोबळी मिरची : 300-350, तोंडली : कळी 200-250, जाड : 90-100, शेवगा : 350-400, गाजर : 120-160, वालवर : 200-220, बीट : 160-200, घेवडा : 300-400, कोहळा : 100-120, आर्वी : 250-300, घोसावळे : 120-140, ढेमसे : 180-200, पावटा : 550-600, भुईमूग शेंग : 300-350, मटार : परराज्य 600-750, तांबडा भोपळा : 40-80, तौतापुरी कैरी : 300-350, सुरण : 180-200, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

पालेभाज्यांच्या भावात घसरण
मार्केटयार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी आहे. त्यामुळे शेपू, मेथी, अंबाडीच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे अनुक्रमे 6, 5 व 4 रुपयांनी घसरण झाली आहे.

तर, कोथिंबिर, कांदापात, चाकवत, करडई, राजगिरा, चाकवत आणि चवळईच्या भावात जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांनी घसरण झाली आहे.

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 500-1000, मेथी : 600-1000, शेपू : 600-800, कांदापात : 700-800, चाकवत : 500-600, करडई : 500-600, पुदिना : 300-400, अंबाडी : 500-600, मुळे : 800-1000, राजगिरा : 500-600, चुका : 500-600, चवळई : 500-600, पालक : 500-600.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.