Pune : कालवा फुटीप्रकरणी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून निघणारा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल येथे राहण्याऱ्या लोकांच्या घरात पाणी शिरले. शेकडो कुटुंबांची घरे उद्ध्वस्त झाली. येथील रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. या संदर्भात पंचनामे करून ताबड्तोब महाराष्ट्र शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. तसेच याप्रकरणी हलगर्जीपणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (ए) वाहतूक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. 

या मागणीचे निवेदन पश्चिम महाराष्ट्र वाहतूक आघाडीचे कार्याध्यक्ष सागर जाधव यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिले आहे. सदरची मागणी मान्य न झाल्यास व या घटनेला जबाबदार असलेल्या लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई न केल्यास हजारो कार्यकर्ते दलित पँथर, आरपीआय यांच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशाराही सागर जाधव यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.