Pune : निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अन्यथा ईव्हीएम फोडू ; मास मुव्हमेंट संघटनेचा इशारा

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणुकीसह सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी मास मुव्हमेंट संघटनेने केली आहे. अन्यथा ईव्हीएम फोडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यामधील आकडेवारीमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. म्हणजेच ईव्हीएम हॅक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने याचा खुलासा करावा. तसेच यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. यावेळी मास मुव्हमेंट संघटनेचे पुणे शहराध्यक्ष मयूर घोडे, पुणे शहर संपर्क प्रमुख दिनेश नवगिरे उपस्थित होते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.