Pune : फेलोशिप वाढीच्या मागणीसाठी संशोधकांनी काढली रॅली

एमपीसी न्यूज- नॅशनल केमिकल लॅबोरेटरी(एनसीएल) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रीसर्च (आयआयएसइआर) येथे संशोधन करणाऱ्या रिसर्च स्कॉलर यांच्यातर्फे फेलोशिप वाढीच्या मागणीसाठी रॅली काढण्यात आली. शुक्रवारी (दि.21) दुपारी 2 वाजता नॅशनल केमिकल लॅबोरेटरी ते पुणे विद्यापीठ अशी रॅली काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सुमारे 150 रिसर्च स्कॉलर सहभागी झाले होते.

सरकारकडून 2014 नंतर या फेलोशिपमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आली नाही. सध्या संशोधन करणाऱ्या स्कॉलर्सना 25 हजार आणि 7000 रुपये घरभाडे भत्ता देण्यात येतो. संशोधकांसाठी पुरेसा नसल्याचे या स्कॉलर्सचे म्हणणे आहे. लॅबमध्ये संशोधक 12 ते 15 तास काम करतात तसेच लॅब मध्ये महागड्या केमिकल्सचा वापर केला जातो. केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण देशभरात पीएचडीच्या विद्यार्थ्यांकडून निदर्शने केली जात आहेत. यापूर्वी देखील सरकारकडून आश्वासने देण्यात आली आहेत परंतु त्याबाबतीत कोणताच निर्णय झालेला नाही. संशोधकांनी फेलोशिपमध्ये वाढ करून घरभाडे भत्त्यात दुपटीने वाढ करावी अशी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.