Pune: मेट्रोच्या कामासाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडायला सुरुवात

Pune: Demolition of flyover at University Chowk for Metro work started पुणे शहरात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोच्या कामासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडायला ‘पीएमआरडीए’ने मंगळवारी (दि.14) सुरुवात केली आहे, अशी माहिती नियोजनकार विवेक खरवडकर यांनी दिली.

पुणे शहरात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत हा उड्डाणपूल पाडण्यात येणार आहे. या काळात विद्यापीठ रस्त्यावरील वाहतूक वळवण्यात येणार आहे. विद्यापीठाने त्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिला आहे.

पुणे महापालिकेतर्फे अटी आणि शर्तींसह उड्डाणपूल पडायला परवानगी दिली आहे. नवा पूल उभारताना महापालिका काहीही खर्च देणार नाही. पूल पाडल्यावर निर्माण होणारा राडारोडा ‘पीएमआरडीए’लाच उचलावा लागणार आहे.

विक्रम कुमार आधी या विभागाचे आयुक्त होते. त्यांना या कामाचा अधिक अनुभव आहे. पुण्यात आता 3 मेट्रो मार्गिका होणार आहेत. आधीच महामेट्रोतर्फे वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. आता ‘पीएमआरडीए’ तर्फे शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम लवकरच सुरू होणार आहे.

त्यासाठी लॉकडाऊनच्या काळात हा उड्डाणपूल पाडायला सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीने हा उड्डाणपूल पाडण्याचे आदेश दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.