Pune : संकटकाळात देवदासींना मिळाला आधार; वीर हनुमान मंडळाकडून दररोज अन्नदान

एमपीसी न्यूज : बुधवार पेठेतील वीर हनुमान मंडळातर्फे गेले महिनाभर सुमारे चारशे देवदासींना जेवण दिले जात आहे. त्यामुळे संकटकाळात या देवदासींना आधार मिळाला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या जेवणासाठी सामान आणणे, स्वयंपाक करणे, वाढणे, नंतरची सर्व साफसफाई करणे ही सगळी कामे मंडळाचे कार्यकर्तेच करीत आहेत. यासाठी आवश्यक ती स्वच्छता पाळली जात आहे. तोंडाला मास्क बांधून, योग्य प्रकारे जेवण तयार करणे हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लॉकडाऊनच्या काळात या मंडळाने स्वतः खर्च करून देवदासींच्या जेवणाची सोय केली.

अखिल बुधवार पेठ देवदासी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश यादव यांनी या उपक्रमाची पाहाणी करुन मंडळाला प्रशस्ती पत्र दिले. मंडळाचे कार्यकर्ते आनंद सागरे, रवींद्र कांबळे, अय्याज खान, गणेश कोळी, सुमित्र कांबळे, कस्तुरी कांबळे, सचिन कांबळे यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.