Pune News : समाजकंटकांकडून तळजाई पठार येथे गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज – धनकवडी (Pune News) येथील तळजाई पठार येथे पार्क केलेल्या गाड्यांची समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. हा प्रकार मागील काही महिन्यापासून सुरु आहे, अशी माहिती मानवधिकार संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष योगेश शिर्के यांनी दिली.

Pune News : कर्करोगमुक्त नागरिकांनी अभिनव पद्धतीने केला जागतिक कर्करोग दिन साजरा

काही जण जाणून बुजून गाड्यांची तोडफोड करत आहेत, गाड्यांची हवा सोडत आहेत. त्यामुळे येथील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहेत. (Pune News) या सर्व प्रकारामुळे परिसरात देखील भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनाही कल्पना दिली, मात्र याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने उद्या (सोमवारी) पुणे पोलीस आयुक्तांना लेखी निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती शिर्के यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.