Pune News : धन्यो गृहस्थाश्रम’ विषयावरील व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

समाजाला गृहस्थाश्रमातून आधार द्यावा : प्रा. माधवी जोशी

एमपीसी न्यूज : ‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’या संस्थेच्या (Pune News)  पुणे शाखेकडून ‘धन्यो गृहस्थाश्रमः’  या विषयावरील वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यानाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. रविवार,26 मार्च रोजी सावरकर स्मारक सभागृह(कर्वे रस्ता,डेक्कन) येथे  हे व्याख्यान झाले. वक्त्या प्रा.माधवी जोशी यांनी हे व्याख्यान दिले.

 

‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी’या संस्थेच्या  पुणे शाखेचे प्रमुख जयंत कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘भारतीय संस्कृती’ मधील  ब्रह्मचर्याश्रम,गृहस्थाश्रम,वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमातील  ‘गृहस्थाश्रम’ महत्त्वाचा आहे , कारण तो इतर तीनही आश्रमांचा आधार आहे. याबद्दलच अधिक जाणून घेण्यासाठी   व्याख्यान आयोजित केले होते.

 

प्रा. माधवी वैद्य म्हणाल्या, ‘उत्तम गृहस्थ घडविण्यासाठी ऋषींनी भरपूर मार्गदर्शन केले आहे. अनेक ऋषींनी चांगला गृहस्थाश्रम जगून दाखवला आहे. त्यातून शिकले पाहिजे.ऋषींनी केवळ राजे घडवले नाहीत, तर ‘ गृहस्थ ‘ घडवले आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम् ‘ ही भावना त्यामागे आहे ‘.

 

Pune News : वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

‘कुशलता आणि खुशाली गृहस्थाश्रमातील स्त्रियांनी सांभाळावी. गृहस्थाश्रमातील गृहस्थाने नीती संमत मार्गाने मिळवलेला पैसा चांगल्या पध्दतीने विनियोग करावा, समाजातील सर्वांना सामावून घ्यावे. आचार्यांपेक्षा पित्याचा, पित्यापेक्षा आईचा मान ठेवला पाहिजे.माता,पिता, अतिथीचा सन्मान केला पाहिजे.

 

पत्नीला समान मान द्यावा, ते एकरूप सामंजस्य आहे, पती पत्नीचे सूर चांगले जुळणे, हे खऱ्या गृहस्थाश्रमाचे उदाहरण आहे, असे ऋषींनी म्हटले आहे. प्रपंचातून परमार्थ घडवायचा आहे. समाजाला गृहस्थाश्रमातून आधार द्यायचा आहे. सृष्टीचे चक्र सुकर करण्यासाठी चांगला गृहस्थाश्रम हितकारक ठरतो ‘, असेही प्रा. माधवी जोशी यांनी सांगीतले. सुहासिनी राणे यांनी स्वागत केले.

 

समर्पित जीवनमार्गाच्या स्मृती जपण्यासाठी उपक्रम

 

वसुंधराताई सातवळेकर यांनी पत्रद्वारा दासबोधाच्या सर्व परीक्षा पूर्ण करुन त्यांनी दासबोधाचा नुसता अभ्यासच नव्हे तर दासबोध प्रत्यक्ष जीवनात उतरवलेला होता. समर्थ रामदास स्वामी आणि स्वामी विवेकानंद हे दोघे योद्धे सन्यासी  त्यांचे  आदर्श होते. त्यांच्या कार्याचा, उपदेशाचा जीवनात कसा उपयोग करायचा हे वसुंधराताईंनी अनेक मार्गांनी शिकवले. त्यांनी लहान मुलांसाठी संस्कार वर्ग घेतले आणि मोठ्यांसाठी प्रवचनेही केली. त्याचप्रमाणे गोष्टीरुप मनाचे श्लोक आणि एकनाथांचे भारुड यावर पुस्तके लिहीली. वसुंधराताईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पती भालचंद्र सातवळेकर यांच्या सहकार्याने विवेकानंद केंद्र पुणे गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ सौ वसुंधराताई सातवळेकर स्मृती व्याख्यान आयोजित करते आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.