Pune : डिजिटल डोअर नंबरची निविदा महापालिका आयुक्तांनी केली अखेर रद्द

एमपीसी न्यूज- शहरातील मिळकतींवर स्मार्ट डिजिटल डोअर नंबर टाकण्याच्या कामाची दहा कोटी रुपयांची निविदा महापालिका आयुक्तांनी रद्द केले आहे. निविदा प्रक्रिया राबविताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला नसल्याचा ठपका आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तांनी महापालिकेच्या कर संकलन विभागावर ठेवला आहे.

मिळकतींवर क्रमांक टाकणे खात्याला आवश्यक वाटत असल्यास त्यासाठी अशी दहा कोटी रुपयांची निविदा काढण्याची गरज नाही पुणे शहरात खासगी आयटी कंपन्यांची संख्या कितीतरी मोठी आहे त्यांना एखाद्या वर्षात करांमध्ये सवलत देऊन सीएसआर अंतर्गत त्यांच्याकडून असे काम करून घेणे सहज शक्य आहे असं आयुक्त व अतिरिक्त आयुक्त कार्यालयाने म्हटले.

दरम्यान, महापालिकेच्या करसंकलन विभागाने ही निविदा जारी केली होती त्यात शहरातील प्रत्येक मिळकतीवर क्रमांक टाकण्यात येणार होता. त्या क्रमांकामुळे त्या मिळकतीचे मोजमाप, मालकाचे नाव, कर किती, कधी जमा केला वगैरे माहिती मिळणार होती. अशाच प्रकारचे काम करसंकलन विभाग आहे यापूर्वी दिले होते, त्या कामाचे काय झाले ते झाले किंवा नाही याची माहिती न घेता तसेच महापालिका आयुक्तांच्या नियमानुसार परवानगी न घेता ही निविदा प्रक्रिया राबवली गेली असल्याचा ठपका देखील आयुक्तांनी ठेवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.