_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune : अपंगत्व आलेल्या दाम्पत्याला लॉकडाऊनमध्ये मिळाली सात लाखांची नुकसान भरपाई

The disabled couple received Rs 7 lakh in lockdown

एमपीसीन्यूज : लॉकडाउनच्या तीन महिन्यांच्या कालावधीत फक्त अतिमहत्वाच्या प्रकरणांसाठी न्यायालयात कामकाज सुरु आहे. मात्र, अपघातात अपंगत्व आलेल्या दाम्पत्याला मोटार अपघात न्यायाधिकरणाच्या माध्यमातून विमा कंपनीकडून तडजोडीअंती पावणेसात लाख रुपयांची भरपाई मिळाली. याकामी विमा कंपनीचे वकिल ॲड. विशाल विजयराव बर्गे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

शिवाजी लोणकर आणि त्यांच्या पत्नी शलाका लोणकर (दोघेही रा. माळवाडी, ता. बारामती ) अशी नुकसान भरपाई मिलेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

लोणकर दाम्पत्य दुचाकीवर जात असताना एका टेम्पोची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघाताने शिवाजी यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्यांना कायमचे अपंगत्व आले. तर त्यांच्या पत्नी शलाका यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.

अपघात घडल्यानंतर लोणकर यांनी ‘फ्युचर जनराली इंडिया इंशुरन्स कंपनी’कडे विम्यासाठी पाठपुरावा केला. हे प्रकरण बारामती येथिल मोटार अपघात न्यायधिकरणाकडे दाखल झाले. दरम्यानच्या काळात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन लागू करण्यात आला.

त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. तसेच न्यायालयातील कामकाजावरही परिणाम झाला होता.

_MPC_DIR_MPU_II

लॉकडाऊनमध्ये लोणकर दाम्पत्याचे वैद्यकीय खर्चामुळे जगणे असह्य झाले होते. त्यांचावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती.

त्यांची हलाखीची परिस्थिती पाहता विमा कंपनीचे कायदा सल्लागार ॲड. विशाल बर्गे यांनी कंपनीचे मुख्य अधिकारी दीपक शिरवळकर, वरिष्ठ अधिकारी सुनीलकुमार सिंग, राखी आनंद, विधी अधिकारी उमाकांत शिरसाठ , जीमीत बुवा, संतोष अर्जुन मोरे आणि सहायक नयन थोरात यांच्या सोबत चर्चा करून त्यांना लोणकर यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती दिली. तसेच मोटार अपघात न्यायधिकरणाचे न्या. बांगडे यांनाही याबाबत अवगत करण्यात आले.

यावेळी सद्य परिस्थिती आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून पावणेसात लाखांची अंतिम नुकसान भरपाई देण्यासाठी न्यायालय, विमा कंपनी आणि लोणकर दाम्पत्य यांच्यात एकमत झाले.

त्यानुसार लोणकर दाम्पत्याला नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्यात आली. त्यामुळे लोणकर दाम्पत्याने समाधान व्यक्त केले.

लॉकडाउनच्या काळात न्यायालयातील अनके खटल्यांचे कामकाज बंद आहे. त्यात नुकसान भरपाईच्या प्रकरणांचा समावेश आहे. मात्र, अपघातामुळे कायमचे अपंगत्व आलेल्या लोणकर दाम्पत्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली होती. अशावेळी फ्युचर जनराली इंडिया इंशुरन्स कंपनीने तडजोडीची तयारी दाखवून मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांना पावणेसात लाखाची भरपाई दिली. लॉकडाउनच्या कालावधीतील न्यायालयीन तडजोडीचे पुणे जिल्यातील हे पहिलेच प्रकरण असल्याचे ॲड. विशाल बर्गे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.