Pune : पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्ण 1 लाख 46 हजार 340

ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 906 इतकी आहे. : Discharge of 1 lakh 1 thousand 636 corona infected patients in Pune division; Total patients 1 lakh 46 thousand 340

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 906 इतकी आहे.

कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 69.45 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

मंगळवार (दि. 11) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 28 हजार 942 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 46 हजार 340 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 561 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 44 , सातारा जिल्ह्यात 174, सोलापूर जिल्ह्यात 323, सांगली जिल्ह्यात 126 तर कोल्हापूर जिल्ह्यात 894 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 12 हजार 131 रुग्णांपैकी 84 हजार 645 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 हजार 934 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 552 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 75.49 टक्के आहे.

सातारा जिल्हा -सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 939 रुग्णांपैकी 2 हजार 806 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 941 आहे. कोरोनाबाधित एकूण 192 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 647 रुग्णांपैकी 7 हजार 626 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 449 आहे. कोरोनाबाधित एकूण 572 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 902 रुग्णांपैकी 1 हजार 692 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 51 आहे. कोरोनाबाधित एकूण 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 11 हजार 721 रुग्णांपैकी 4 हजार 867 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 531 आहे. कोरोनाबाधित एकूण 323 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.