Pune : खडकवासला धरणातून १६ हजार ४७८ क्युसेकने विसर्ग सुरु, भिडे पुलावरून प्रवास टाळा – महापौर

Discharge of 16 thousand 478 cusecs from Khadakwasla dam, avoid travel from Bhide bridge: Mayor

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून गुरुवारी सायंकाळी सात वाजल्यापासून १६ हजार ४७८ क्युसेक वेगाने मुठा नदी पात्रात पाणी सोडणार येणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रसिद्ध भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली जाणार आहे.

भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता येथून प्रवास करणे टाळावे, तसेच नदी पात्रालगतच्या रहिवाशांनी अधिकची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

मागील 10 दिवसांपासून पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. या धरणाची क्षमता खूपच कमी असल्याने त्यातून पाणी सोडण्यात येत आहे.

सध्या खडकवासला साखळीतील चारही धरणांत 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टाळले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.