Pune : कोरोनाच्या 207 रुग्णांना डिस्चार्ज, 7 जणांचा मृत्यू; 268 नवे रुग्ण

Discharge of 207 patients of corona, death of 7; 268 new patients

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाचे 207 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर 7 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 268 नवे रुग्ण आढळले. दरम्यान, पुणे शहरात रुग्ण कोरोनमुक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात आतापर्यंत या कोरोनामुळे 413 जण दगावले आहेत. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. शहरात कोरोनाचे एकूण 8 हजार 777 रुग्ण झाले आहेत.

याशिवाय 5 हजार 782 कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 2 हजार 582 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 216 क्रिटिकल रुग्ण असून, 53 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सासवडमधील 82 वर्षीय महिलेचा डी. एच. औंध हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 44 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, गंजपेठेतील 54 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 75 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, न्यू मंगळवार पेठेतील 56 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, रामटेकडी हडपसरमधील 31 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, तर हडपसरमधील 70 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पुणे शहरात आता कोरोनाचे रुग्ण साडे आठ हजारांच्या पुढे गेले आहेत. तर, 413 नागरिकांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे या रोगातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे.

आगामी काळात आणखी कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात येणार असल्याचे प्राशासनातर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.