Pune: पुणे विभागातील 48,455 कोरोना बाधितांना डिस्चार्ज; विभागातील एकूण रुग्णसंख्या 84 हजार 455

Pune: Discharge of 48,455 corona victims in Pune division; The total number of patients in the division is 84455 आजपर्यत विभागामध्ये एकूण 4 लाख 21 हजार 538 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 15 हजार 908 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 48,455 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 84,455 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण 33 हजार 649 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 2 हजार 351 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 921 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 57.37 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

26 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकूण 4 लाख 21 हजार 538 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4 लाख 15 हजार 908 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 178 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 3 लाख 31 हजार 75 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 50 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 95, सातारा जिल्ह्यात 125, सोलापूर जिल्ह्यात 233, सांगली जिल्ह्यात 166 तर कोल्हापूर जिल्ह्यात 431 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा- पुणे जिल्हयातील 68 हजार 686 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 41 हजार 399 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 25 हजार 617 आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 17 हजार 736, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 528 व पुणे कॅन्टोंन्मेंट 175, खडकी विभागातील 50, ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 33, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील 95 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 670 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 181, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 291 व पुणे कॅन्टोंन्मेंट 31, खडकी विभागातील 33, ग्रामीण क्षेत्रातील 90, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील 44 रुग्णांचा समावेश आहे.

तसेच 662 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.27 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 98 रुग्ण असून 1 हजार 678 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 316 आहे. कोरोनाबाधित एकूण 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 7 हजार 67 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 727 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 906 आहे. कोरोना बाधित एकूण 434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 493 रुग्ण असून 462 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 987 आहे. कोरोना बाधित एकूण 44 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील 4 हजार 111 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 189 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 823 आहे. कोरोना बाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.