Pune : कोरोनाच्या 119 रुग्णांना डिस्चार्ज, 143 नवे रुग्ण ; 12 जणांचा मृत्यू

119 corona patients discharged,143 new patients; 12 died

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 119 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. दिवसभरात 143 नवे रुग्ण आढळले. तर 12 जणांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 403 नागरिक दगावले आहेत.

पुणे शहरात कोरोनाचे एकूण 8 हजार 205 रुग्ण आहेत. त्यातील 5 हजार 304 कोरोनामुक्त झाले आहेत. 2 हजार 498 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

189 क्रिटिकल रुग्ण असून, 37 जण व्हेंटिलेटरवर आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बिबवेवाडीतील 45 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 70 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सिंहगड रस्त्यावरील 78 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 69 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तर सदाशिव पेठेतील 64 वर्षीय महिलेचा पुना हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 75 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, नवी पेठेतील 73 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, पर्वती दर्शन भागातील 60 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 65 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, सहकारनगरमधील 74 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, आंबील ओढा वसाहतमधील 67 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 72 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त उच्च रक्तदाब, मधुमेह असे अनेक आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.