Pune : कोरोनामुक्त 142 रुग्णांना डिस्चार्ज, 12 मृत्यू; 305 नवे कोरोना रुग्ण

Discharge to 142 coronafree patients, 12 deaths; 305 New corona patients

एमपीसी न्यूज – कोरोनातून ठणठणीत बरे झालेल्या 142 रुग्णांना आज, शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनाने 12 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 305 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. सध्या शहरात 222 क्रिटिकल रुग्ण असून, 49 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत 425 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण रुग्णसंख्या 9 हजार 82 आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

पर्वतीमधील 69 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 46 वर्षीय महिलेचा व कोंढाव्यातील 56 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, तर कोंढाव्यातील 52 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, गुलटेकडीतील 61 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच कसबा पेठेतील 74 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 50 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, पुणे कॅम्पमधील 65 वर्षीय महिलेचा राव नर्सिंग होममध्ये, पर्वतीमधील 73 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 79 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 62 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 55 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, तर सोलापूर जिल्ह्यातील 70 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. शहरात आता कोरोनाचे 9 हजारांच्यावर रुग्ण आहेत. तर, आजपर्यंत या आजाराने 425 जणांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.