Pune Corona Update : कोरोनाच्या 271 रुग्णांना डिस्चार्ज, 304 नवे रुग्ण; 5 जणांचा मृत्यू

Discharge to 271 patients of corona, 304 new patients; 5 killed पुणे शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 8 हजार 509 झाली आहेत. तर, या रोगामुळे आतापर्यंत 406 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 271 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज, बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 304 नवे रुग्ण आढळले.

शहरात सध्या 214 क्रिटिकल रुग्ण असून, 43 जण व्हेंटिलेटरवर आहेत. शहरात कोरोनाचे एकूण 8 हजार 509 रुग्ण झाले आहेत. तर, या रोगामुळे आतापर्यंत 406 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आज कोरोनामुळे झालेल्या मृतांमध्ये चार जण जेष्ठ नागरिक असून, एकाचे वय 50 वर्ष आहे. यामध्ये दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

पुण्यात सक्रिय रुग्णसंख्या 2 हजार 528 आहे. आजपर्यंत एकूण 5 हजार 575 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या आज 1 हजार 949 चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

जनता वसाहतमधील 62 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 69 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, औंधमधील 50 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, हवेली तालुक्यातील 61 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये आणि जळगांव जिल्ह्यातील 64 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. आगामी काळात आणखी कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढणार आहे.

मात्र, पुणेकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

शहरात आता साडे आठ हजरांच्या पुढे कोरोना रुग्णांची संख्या गेली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने पुणे महापालिकेला करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.