Pune : कोरोनामुक्त 522 रुग्णांना डिस्चार्ज; 486 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

Discharge to 522 patients free of corona; 486 new patients, 30 deaths

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे मंगळवारी तब्बल 30 जणांचा मृत्यू झाला. 522 जण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, कोरोनाच्या 486 नवीन रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे आज कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.

शहरात सध्या विविध रुग्णांलयांमध्ये 350 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 59 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत 10 हजार 451 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

कोरोनामुळे आतापर्यंत 643 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे 6 हजार 134 ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर शहरातील खासगी व महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनाचे आता 17 हजार 228 रुग्ण झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

बोपोडीतील 55 वर्षीय महिलेचा डी. वाय. हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 70 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 69 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, रास्ता पेठेतील 75 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 52 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, खराडीतील 67 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 60 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, कर्वे रस्त्यावरील 74 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 50 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

, एरंडवनेतील 76 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, गोखले नगरमधील 74 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 74 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, साने गुरुजी नगरमधील 57 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, मंगळवार पेठेतील 48 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, शुक्रवार पेठेतील 46 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 64 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, एरंडवनेतील 83 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

तर फुरसुंगीतील 57 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 59 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 75 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, वडगावशेरीमधील 58 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, गणेश मळा भागातील 63 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 73 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 54 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, श्रमिक वसाहतमधील 69 वर्षीय महिलेचा AICTS हॉस्पिटलमध्ये, पुणे कॅम्पमधील 74 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, खडकीतील 71 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, खडकीतील 61 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, हवेलीतील 55 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, सोलापूर जिह्यातील 71 वर्षीय पुरुषाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.