Pune : पुणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धंगेकर, शिंदे, जोशी, छाजेड, तिवारी यांच्या नावाची चर्चा

एमपीसी न्यूज : – आगामी पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune)पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी( Pune)जोरदार सुरू केली आहे. त्याच संदर्भात काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शरद पवार गट यांचा संयुक्त मेळावा येत्या 24 फेब्रुवारी रोजी आयोजित केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला येणार असून, घटक पक्षांना प्रचार करावा लागणार आहे.
काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी आमदार मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड, गोपाळ तिवारी यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे.

Pune: 11 गावांतील विकासकामे बंद होता कामा नये ; माजी नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी 

काँग्रेसमधील एक गट पुणे शहरातून उमेदवारीसाठी ‘ओबीसी’ चेहरा असावा, अशी मागणी करत आहे, तर दुसऱ्या गटाकडून ‘मराठा’ उमेदवारासाठी दिल्लीत ‘फिल्डिंग’ लावण्यात आल्याची कुजबुज सुरू आहे. पुणे लोकसभेला मराठा की इतर मागासवर्गीय (ओबीसी) यापैकी कोण उमेदवार असावा, यावरून काँग्रेसमध्ये तर्कवितर्क सुरू आहे. उमेदवारीच्या स्पर्धेत माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

 

छाजेड आणि तिवारी यांनी पाक्षाची बाजू भक्कमपणे सांभाळली आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाचा विचार काँग्रेसने करावा, अशी मागणी होत आहे. तर, काँग्रेस भवनमध्ये होणाऱ्या मेळाव्यात, शरद पवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे काय मार्गदर्शन करणार, याची उत्सुकता लागली आहे.

 

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share