Pune : थाळ्या वाजवून गणेश मंडळाने केला डीजे बंदीचा निषेध

एमपीसी न्यूज- मुंबई उच्च न्यायालयाने डीजे आणि डॉल्बी वाजविण्यावर बंदी घातल्यामुळे अनेक गणेशमंडळांच्या कार्यकर्त्यांचा विरस झाला आहे. अनेक मंडळांनी पोलिसांच्या विरोधाला न जुमानता न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करीत डीजे वाजवले. तर काही मंडळांनी फ्लेक्सद्वारे आपला निषेध नोंदवला. पुण्यातील एका मित्रमंडळाने टिळक रस्त्यावर चक्क जोरजोरात थाळ्या वाजवून डीजेबंदीचा निषेध केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.