Pune : पावसामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज – पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भागातील तसेच पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात मुसळाधार पावसामुळे आणि धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे खबरदारी म्हणून काही भागातील वीज पुरवठा महावितरणला आज सकाळपासून बंद ठेवावा लागला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळपासून पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नद्यांमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने सखल भागात पाणी साचले आहे. नागरिकाच्या सुरक्षेसाठी काही भागातील विजयंत्रणा सकाळपासून बंद ठेवण्यात आली. त्याप्रमाणे काही भागात वीज वाहिनीवर झाडे पडल्याने व फिडर पिलरमध्ये पाणी शिरल्याने वीज पुरवठा बंद ठेवावा लागला.

  • मुळा, मुठा, पवना आणि रामनदी नदीकाठी असलेल्या काही सखल भागात पाणी साचल्यामुळे वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला. औध, बोपोडी, बावधन, बाणेर, बालेवाडी, मधुबन कॉलोनी, जुनी संघवी, वाकड गावठाण, कस्पटे वस्ती, पवनानगर, चिंचवड, पिंपळे निलख, कासारवाडी, काळेवाडी, शिवतीर्थ, इ.भागातील काही वस्त्यांमधील रोहित्रे पाण्याखाली आल्यामुळे तेथील वीज पुरवठा नागरिकांच्या सुरक्षेसाठी बंद ठेवावा लागला.

जिल्हा प्रशासनाने पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचे कळविले असून महावितरणला नागरिकाच्या सुरक्षेतेसाठी योग्य ती काळजी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. तेंव्हा ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आहवान पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.