Pune : लॉकडाऊन काळात प्रभाग क्र. 18 आणि घोरपडे पेठ परिसरात गरजुंना 7 हजार ‘धान्य किट’चे वाटप

एमपीसी न्यूज – देशात ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली दि.7 ते 10 एप्रिल दरम्यान प्रभाग क्र. 18 मध्ये तसेच घोरपडे पेठ परिसरात सुमारे 7 हजार धान्य किटचे वाटप करण्यात आले.

घोरपडे पेठेतील 164 मुनीयाचा तकीया, 224 नम्रता बिल्डिंग समोरील परिसर, धोबीघाट परिसर,180 घोरपडे पेठ पुर्ण, झगडेवाडी परिसर पुर्ण,पेंटर वाडा,45,105 घोरपडे पेठ,मीरा मार्केट परिसर, पंचहौद मित्र मंडळ परिसर, जोशीसमाज सर्व वस्ती, तसेच लकी बेकरी गुरुवार पेठ परिसर, खडकमाळआळी, खेडेकर भाजी मार्कट,व नवलोबानाथ मंदीर परिसर,साईबाबा गल्ली, जहागीरदार मारूती परिसर पायगुडे गल्ली, प्रभागातील सर्व नागरिकांना किराणा सामानाचे तिसऱ्या टप्प्यातील एकूण 7 हजार धान्य किटचे वाटप स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अजय खेडेकर, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, प्रभाग अध्यक्ष राजेन्द्र काकडे, जयसिंग रजपूत, योगेश वेदपाठक, राजू खेडेकर, राजेंद्र भोसले, नंदू झेंडे, अण्णा ओतूरकर, जयदीप परदेशी, विठ्ठल शिरस, नंदू पवार, राजु पाथरे,सोमा धायगुडे, बहिरीनाथ ढवळे, काका पिसाळ, राजू थोरात, आशू शेख, किशोर शिंदे,माने, हिरामण जाधव, विशाल जाधव यांच्याबरोबरच भाजपाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.