Pune: रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप

Pune: Distribution of essential kits to autorickshaw drivers रिक्षाचालकांना ५ किलो आटा पाकीटे, कॉटनचे वॉशेबल मास्क, अर्सेनिक अल्बम ३० च्या रोगप्रतिकारक शक्तीवाढीच्या गोळ्या यांचे वाटप करण्यात आले.

एमपीसी न्यूज – वारजे परिसरतील रिक्षाचालकांना आणि भजनी मंडळातील काही गरजवंताना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. मदत नव्हे कर्तव्यच म्हणून भारतीय जनता पार्टी, पुणे शहरतर्फे स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या यांचे हस्ते वारजे परिसरातील भजनी मंडळातील काही गरजवंतांना कोरडा शिधा कीट आणि अतुलनगर रिक्षा स्टॅन्डवरील ३० रिक्षाचालकांना ५ किलो आटा पाकीटे, कॉटनचे वॉशेबल मास्क, अर्सेनिक अल्बम ३० च्या रोगप्रतिकारक शक्तीवाढीच्या गोळ्या यांचे वाटप करण्यात आले.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण पुणे शहरात भाजपचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे गरजवंताच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करीत आहेत.

आज तीन महिन्यानंतरही भाजपाचा कार्यकर्ता कुठेही कमी पडत नाही याचा विशेष आनंद होत असल्याचे शहराध्यक्ष मुळीक यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रतिक देसरडा, संतसेवक कैलास देवकर, पै. आप्पा दांगट, संदीप कडु, सलीम शाह, अनंता गांडले, अमजद अन्सारी, मुकुंद जाधव, सुरज भालेराव यांचेसह अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दांगट यांनी केले होते. कोरोनाच्या संकट काळात दांगट यांनी मागील 3 महिन्यांपासून सातत्याने अन्नधान्य वाटप कार्यक्रम सुरूच ठेवला आहे.

समाजात राहत असताना त्याचे काही तरी देणे लागते, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर, उत्तरप्रदेशमधील काहींना गावांकडे जाण्याची सोय सुद्धा त्यांनी करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.