Pune : राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे सिंहगडावर वन कर्मचाऱ्यांना धान्य किटचे वाटप

Distribution of grain kits to forest workers at Sinhagad by Raje Shivrai Pratishthan

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन काळात अनेक लोकांच्या कामावर परिणाम झाला असताना देखील अखंडपणे सेवा करून किल्ले सिंहगडाचं रक्षण करणाऱ्या सर्व कंत्राटी वन कर्मचाऱ्यांना राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने धान्य किटचे वाटप, तर पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना फेसशील्ड मास्कचे वितरण करण्यात आले.

निसर्गाच्या सर्व चक्रांमध्ये किल्ले सिंहगडाचे सौन्दर्य अबाधित राहण्यासाठी मेहनत घेणाऱ्या कंत्राटी वन कर्मचाऱ्यांना आधार देणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे सिंहगड येथील 50 कंत्राटी वन कर्मचाऱ्यांना अन्न धान्य किटचे वाटप करण्यात आले.

त्याचप्रमाणे उपस्थित पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना फेसशील्ड मास्कचे वितरण करण्यात आले.

राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक महेश पवळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या प्रसंगी शहर प्रमुख विक्रम बर्गे, शिवाजी खरात, रणजीत टेमघरे, अमित जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

किल्ले सिंहगडाच्या संवर्धनासाठी राजे शिवराय प्रतिष्ठान गेली सोळा वर्षे सतत कार्यरत आहे. या प्रसंगी वन अधिकारी श्री. जिवडे यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.