Pune : पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनच्यावतीने डॉक्टरांना पीपीई किट वाटप

Distribution of PPE kits to doctors on behalf of Western Maharashtra Tax Advisory Association

एमपीसी न्यूज – ‘डॉक्टर्स डे’ निमित्त पश्चिम महाराष्ट्र कर सल्लागार असोसिएशनच्यावतीने पुना हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना 50  पिपीई किट वाटप करण्यात आले.

संस्थेच्या यादव भवन येथील मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सोसिएशनचे अध्यक्ष शरद सूर्यवंशी, माजी अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, उपाध्यक्ष विलास आहेरकर, स्पोर्ट्स कमिटीचे उमेश दांगट, माजी उपाध्यक्ष मनोज चितळीकर, अनिरुद्ध चव्हाण, विनोद रहाटे, प्रणव शेठ, स्वप्नील शहा ,पुना हॉस्पिटलचे डॉ. हिमांशु खारकर (व्यवस्थापक), नरेश दवे आदी उपस्थित होते.

शरद सूर्यवंशी आणि नरेंद्र सोनवणे यांनी करोना महामारीच्या काळात डॉक्टर्स मोलाची कामगिरी बजावत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचा डॉक्टर्स डे निमित्ताने दिनानिमित्त सत्कार महत्वाचा आहे.

तर मास्कचा नेहमी वापर महत्वाचा असून त्याने बराच बचाव होतो. सध्या कोरोनाच्या संकट काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असल्याचे असे डॉ. हिमांशु शहा यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे महापालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. अन्यथा 500 रुपये दंड आकारण्याचा इशारा दिला आहे. दंड न भरल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना मास्क घालावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like