Pune : स्काऊट गाईड जिल्हा संस्थेच्या वतीने राज्य पुरस्कारांचे वितरण

एमपीसी न्यूज – स्काऊट गाईड जिल्हा संस्था पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा राज्य पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. 27) पार पडला. यामध्ये नऊ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

स्काऊट गाईड जिल्हा संस्था पुणे यांचा वार्षिक सभा व पुरस्कार वितरण समारंभ पुण्यातील शामकांत बर्वे सभागृहात पार पडला. यावेळी स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे पुणेचे अध्यक्ष दिगंबर देशमुख, उपाध्यक्ष शहाजी ढेकणे, ज.म.डुंबरे जिल्हा मुख्य आयुक्त सुधाकर तांबे, राज्य आयुक्त (गाईड) शकुंतला झगडे, माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब, गटशिक्षणाधिकारी आंबेगाव पोपटराव महाजन (माळी), विजया पाटील, गटशिक्षणाधिकारी मुळशी माणिक बांगर, माजी शिक्षणाधिकारी दत्तात्रय शेंडकर आदी उपस्थित होते.

  • साहील किसन बोरकर, आदित्य अशोक देसाई, विजय बापू शेळके, वैष्णव पांडुरंग पानमंद, प्रज्वल विरुपाक्ष कुंभार, ऋषिकेश काळूराम कुसूमकर, अनिरुद्ध अनिल कळसकर, समर्थ उमाकांत कुलकर्णी, वेदांग संदीप सकपाळ या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड मधील राज्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.