Pune : पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे दूध विक्री दरात दोन रुपयांची वाढ

एमपीसी न्यूज – राज्यात अवकाळी पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती, शेतकऱ्यांचे, पिकांचे, जनावरांचे झालेले नुकसान, चारा टंचाई तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे.

दूध उत्पादनात झालेली घट या बिकट परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुधभूकटी व बटरच्या दरात झालेली वाढ यामुळे पिशवीबंद दूध विक्रीसाठी कमी झालेली दुधाची उपलब्धता यामुळे पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने खरेदी दरात वाढ केलेली आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता, (दि. 6) पासून सर्व प्रकारचे कात्रज दूधाचे विक्री दर प्रति लिटर दोन रुपये वाढविण्यात येत आहे. ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.