Pune District Corona Update: शहरी भागात 60 टक्के तर ग्रामीण भागात 71 टक्के रुग्णांची कोरोनावर मात

Pune District Corona Update: In urban areas 60 per cent and in rural areas 71 per cent patients overcome corona पुणे जिल्ह्यात 60.57 टक्के कोरोनामुक्त, 3.78 टक्के कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 35.65 टक्के सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात काल (रविवारी) 675 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 15 हजार 679 वर पोहचला आहे. त्यापैकी 9 हजार 496 म्हणजेच 60.57 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र सोडून उर्वरित ग्रामीण भागातील कोरोनामुक्तांचे प्रमाण 71 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 4 हजार 734 कोरोना चाचण्या झाल्या असून त्यापैकी 15 हजार 679 चाचण्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यापैकी 9 हजार 496 (60.57 टक्के) रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 592 (3.78 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 5 हजार 591 (35.65 टक्के) रुग्णांवर अजून विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी 340 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असल्याचे अहवालात म्हटले आहे.

पुणे महापालिका क्षेत्रात 12 हजार 502 कोरोनाबाधितांची नोद झाली असून त्यापैकी 7 हजार 417 (59.33 टक्के) रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 502 (4.02 टक्के) कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 4 हजार 551 (36.40 टक्के) सक्रिय रुग्ण आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात 1 हजार 744 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 1 हजार 59 (60.72 टक्के) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 43 (2.47 टक्के) कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून 642 (36.81 टक्के) सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उर्वरित निमशहरी व ग्रामीण भागात 1 हजार 433 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1 हजार 20 रुग्ण (71.17 टक्के) कोरोनामुक्त झाले आहेत. या भागात आतापर्यंत 47 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृत्यूदर 3.28 टक्के आहे. या भागात 398 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हे प्रमाण 27.77 टक्के इतके खाली आले आहे.

नगरपालिका क्षेत्रांत 159 कोरोनाबाधित

जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रनिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. बारामती – 11, दौंड – 91, जेजुरी – 1, तळेगाव दाभाडे – 16, चाकण – 8, सासवड – 10, लोणावळा – 3,  शिरुर – 1, आळंदी – 2, जुन्नर – 1, इंदापूर 13, भोर -2 (एकूण 159)

कॅन्टोन्मेंट क्षेत्रात 641 कोरोनाबाधित

जिल्ह्यांतील कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रांतील कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड – 496, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड – 140, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड – 5 (एकूण 641)

ग्रामीण भागात 523 कोरोनाबाधित

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. हवेली – 203, जुन्नर -38, शिरूर -26, मुळशी – 34, वेल्हा – 33, भोर – 17, बारामती – 13, इंदापूर – 7, दौंड – 11, मावळ – 35, खेड – 44, आंबेगाव – 47, पुरंदर – 15 (एकूण 523).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.