Pune District Crime News : कुत्रा भुंकला म्हणून मालकाला मारहाण

एमपीसी न्यूज : पाळीव कुत्रा भुंकल्याच्या रागातून दोघांनी त्याच्या मालकाला बेदम मारहाण केली. पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे 21 ऑक्टोबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुल यशवंत वाघमारे (वय 23) यांनी फिर्याद दिली असून आरोपी अनुप वाघमारे आणि अब्रार शेख यांच्या विरोधात लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फिर्यादी यांच्या घरासमोर बांधलेल्या अवस्थेत त्यांचा पाळीव कुत्रा होता. यावेळी आरोपी घरासमोरून जात असताना हा कुत्रा त्यांच्या अंगावर भुंकला. याचा राग आल्याने आरोपीने फिर्यादी यांना लोखंडे रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या कपाळावर आणि पायावर जखमा झाल्या आहेत.

फिर्यादीने याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक यादव करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.