Pune District Crime News : अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या सात जणांना अटक, एक लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : प्रतिबंधीत उजनी पाणलोट क्षेत्रात माशांची अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या सात जणांना इंदापूर पोलीसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून 1 लाख 2 हजार 200 रुपये किंमतीचे 1 हजार 80 किलोग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या जातींचे लहान सुकवलेले मासे जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सोमवारी (दि. 23) उजनी पाणलोट क्षेत्रात लहान माशांची मासेमारी करून ते वाळवून अकलूज बायपास येथून एका वाहनामध्ये मासळी बाजारात विक्रीसाठी घेवून चालले असल्याची माहिती इंदापूर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अकलूज बायपास सरस्वतीनगर येथे मालवाहू जिप ताब्यात घेतली.

या जीपमध्ये 48 सुती गोण्यांत वेगवेगळ्या जातींचे लहान आकाराची सुकवलेली माशांची पिल्ले भरलेली पोती आढळून आली. या जिपमधील नारायण आसाराम बनारे यांना या माशांबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडविची उत्तरे दिली. त्यांच्याकडे मासे पकडण्याचा कोणताही परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

याबाबत संजय नारायण मेटे (वय 52, रा.बारामती) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.