Pune : पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे रविवारी ‘पंच’ शिबिर

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने उद्या रविवारी (दि. 12) सकाळी 8.00 वाजता शाहू महाविद्यालय पर्वती येथे एक दिवसीय वार्षिक कबड्डी पंच शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या पंच शिबिरास जिल्ह्यातील सर्व पंचांनी उपस्थित रहावे, असे अावाहन पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह मधुकर नलावडे यांनी  केले आहे. या शिबिरात नवीन नियमांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.