Players Felicitation: पुणे जिल्हा संघात निवड झालेल्या खेळाडूंचा महापालिकेच्या वतीने सत्कार

एमपीसी न्यूज : जिल्हास्तर कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा जिंकत निवड चाचणीमध्ये यशस्वी ठरल्यामुळे क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या (Players Felicitation) मनीषा राठोड व भूमीका गोरे व शिफा वास्तव यांचा महापालिकेच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त विठ्ठल जोशी, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, डॉ.अशोक कोल्ह, चंद्रशेखर कदम व  बन्सी आटवे हे उपस्थित होते. या खेळाडूंना अशी आटवे बी.जी. (क्रीडा मार्गदर्शक)यांचे मार्गदर्शन लाभले.

Crime News : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन तडीपार गुंडांना कोयत्यासह अटक

पिंपरीतील नेहरूनगर स्टेडीअमवर या स्पर्धा पार पडल्या.(Players Felicitation) 48 वी जिल्हास्तर कुमारी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धा क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाने जिंकली. संघातील मनीषा राठोड, भूमिका गोरे व शिफा वस्ताद यांची पुणे जिल्ह्याच्या संघात निवड झाली.त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

मी स्वतः विद्यापीठ कबड्डी खेळाडू असून आपल्या शहराचा कबड्डी क्षेत्रात नावलौकिक वाढविल्याबद्दल तुमचे अभिनंदन. भारतीय कबड्डी संघात भविष्यात खेळण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!”असा मनोदय मा.आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.