Pune : जिल्हास्तरीय सबज्युनिअर,ज्युनिअर अजिंक्यपद कॅरम स्पर्धा 4 जानेवारीला होणार

एमपीसी न्यूज – कॅरम असोसिएशन ऑफ पुणेच्या वतीने जिल्हास्तरीय सबज्युनिअर,ज्युनिअर अजिंक्यपद कॅरम स्पर्धा आयोजित केली आहे. हि स्पर्धा दि. 4 ते 5 जानेवारी 2020 रोजी घेण्यात येणार आहेत. ह्या स्पर्धा मंगलसेन विरंगुळा केंद्र, संत तुकाराम नगर, वल्लभनगर पुणे 411018 येथे होणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले आहे.

नाव नोंदणीची अंतिम तारीख दि. 1/1/2020 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) आहे. स्पर्धेची फी 100/- रूपये असून इच्छुकांनी नांव नोंदणीसाठी जिल्हा सेक्रेटरी नंदू सोनवणे यांचेकडे संपर्क साधून स्पर्धेची फी जमा करावी किंव्हा 9822214772 या क्रमांकावर संपर्क साधावा.

पुणे जिल्हातून खाली नमूद केलेल्या गटातील मुले आणि मुली यांची जिल्हास्तरीय सबज्युनिअर,ज्युनिअर अजिंक्यपद कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहे, असे आयोजकांनी सांगितले आहे.

निवड स्पर्धा गट :

  • मुले
    1)12 वर्षाखालील मुले.
    2)14 वर्षाखालील मुले.
    3)18 वर्षाखालील मुले.
    4)21वर्षाखालील मुले.

मुली :
1)12 वर्षाखालील मुली.
2)14 वर्षाखालील मुली.
3)18 वर्षाखालील मुली.
4)21वर्षाखालील मुली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.