Pune District News : नारायणगावात शेतकऱ्याचा वखारीतून 550 किलो कांद्याची चोरी

एमपीसीन्यूज : कांद्याचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शंभर ते दीडशे रुपये किलो कांद्याचा दर पोहोचला आहे. या परिस्थितीचा फायदा चोरट्यांनी ही उचलला आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून चोरट्यांनी कांद्याचा वखारीमधून 550 किलो कांदा चोरून नेला. बुधवारी (21 ऑक्टोबर) रात्री हा प्रकार घडला.

याप्रकरणी शेतकरी दत्तात्रय नाथा थोरात (वय 23) यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. आरोपी संजय पारधी आणि पोपट काळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील देवजाळी गावात फिर्यादी यांची कांद्याची वखार आहे. बुधवारी रात्री साडेअकरा ते अडीच वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या वखारीतून आणि त्यांच्या शेजारी असणाऱ्या अन्य एका वखारीतून जवळपास पाचशे पन्नास किलो कांदा चोरून नेला.

फिर्यादी जेव्हा शेतात पोहोचले तेव्हा त्यांना हे दोन आरोपी त्या ठिकाणी आढळून आले.

त्यानंतर फिर्यादीने नारायणगाव पोलिस स्टेशन गाठत दोन्ही आरोपी विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंड करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III