Pune : उद्धवजी आणि देवेंद्रजीना एकत्र आणण्याची फारच घाई झाली आहे – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज :  पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर उद्धवजी आणि देवेंद्रजी भविष्यात एकत्र येतील का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,उद्धवजी आणि देवेंद्रजीना (Pune) एकत्र आणण्याची तुम्हाला फारच घाई झाल्याचे दिसत आहे.अशा गोष्टी एक्सक्लूसीव करायच्या असतात. त्यामध्ये खर्या अर्थाने एक मज्जा असते. त्या एक्सक्लूसीव मध्ये देखील मी नसल्याचे सांगताच एकच हशा पिकला.

 

Pune : नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिसांचा विशेष सेवा पदक देऊन सन्मान

 

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकी नंतर चंद्रकांत पाटील बैठकी बाबत सविस्तर माहिती दिली. (Pune) त्यावेळी शिंदे फडणवीस सरकारकडून सावरकर गौरव यात्रा काढत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथील सभेत सावरकर यांच्या बद्दल अपमान सहन करणार नसल्याची भूमिका मांडली आहे.

 

तर भविष्यात दोघे एकत्र येऊ शकतात का ? त्या प्रश्नावर भाजपचे नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की,उद्धवजी आणि देवेंद्रजीना एकत्र आणण्याची तुम्हाला फारच घाई झाल्याची दिसते.काल आणि आज देखील तोच प्रश्न विचारला आहे. तसेच मी भविष्यकर्ता देखील नाही आणि अशा गोष्टी एक्सक्लूसीव ली करायच्या असतात. त्यामध्ये खर्या अर्थाने एक मज्जा असते. त्या एक्सक्लूसीव मध्ये देखील मी नसल्याचे सांगताच एकच हशा पिकला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.