Shivshahi bus accident : सासवडजवळ कंटेनर आणि शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ रविवारी मध्यरात्री शिवशाही बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे.(Shivshahi bus accident) मध्यरात्रीच्या सुमारास उरुळी देवाच्या हद्दीत हा अपघात झाला. यातील मयत व्यक्ती ही कंटेनर चालक असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात आणखी सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी मध्यराञी वेळ 12:29 वाजता दिनांक 19 रोजी सासवड रस्ता, ऊरळी देवाची, हॉटेल सोनाई जवळ शिवशाही बस व कंटेनरचा अपघात झाला होता. अपघात होऊन काही जण जखमी असून गाडीमधे अडकले असल्याची वर्दी अग्निशमन दलाकडे मिळाली असता तातडीने काळेबोराटे नगर अग्निशमन केंद्रातील वाहन वर्दीवर पाठवण्यात आले.

घटनास्थळी पोहोचताच अग्निशमन अधिकारी अनिल गायकवाड यांनी नियंत्रण कक्षास कळविले की, सदर ठिकाणी शिवशाही बस MH14 GO 3104 (पंढरपुर-स्वारगेट) व कंटेनर MH18 AA 7190 यांचा मोठा अपघात झाला असून दलाची मदत पोहोचण्यापूर्वी शिवशाही बसमधील 4 जखमींना नागरिकांनी बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले होते. तर कंटेनर ड्रायव्हर यालादेखील रुग्णालयात रवाना केले होते. (5 जखमी)

Farmer’s weekly market : गाडा रोड ताथवडे येथे शेतकरी आठवडी बाजाराचे आयोजन 

दलाच्या जवानांनी पाहणी केली असता शिवशाही बसमधे ड्रायव्हर सीटमागे एक जखमी व्यक्ती अडकला होता. तात्काळ अग्निशमन उपकरण फायर एक्स वापरत पाचच मिनिटात सीटवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करून त्याला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले.(Shivshahi bus accident) घटनास्थळी क्रेनची मदत आली असल्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

घटनास्थळी एकूण जखमी व्यक्ती 6 असून काळेबोराटे नगर,(Shivshahi bus accident) कोंढवा बुद्रुक व अग्निशमन मुख्यालय येथील रेस्क्यु व्हॅन अशी 3 अग्निशमन वाहने वेळेत दाखल झाली होती. अपघाताचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.