Pune Division Corona Report: पुणे विभागातील 40 हजार 99 कोरोना बाधित रुग्ण ठणठणीत; 23,931 रुग्ण सक्रिय

Pune Division Corona Report: 40099 corona infected patients in Pune division; 23,931 patients activeपुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.97 टक्के इतके आहे

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 40 हजार 99 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 65 हजार 989 झाली आहे. तर सक्रिय रुग्ण 23 हजार 931 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकूण 1 हजार 959 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 794 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.77 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.97 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकूण 3 लाख 32 हजार 256 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 3 लाख 27 हजार 264 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 992 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 60 हजार 534 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे.

सोमवारच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 75 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 563, सातारा जिल्ह्यात 3, सोलापूर जिल्ह्यात 202, सांगली जिल्ह्यात 54 तर कोल्हापूर जिल्ह्यात 253 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 54 हजार 13 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 34 हजार 371 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 हजार 244 आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 12 हजार 695, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 803 व पुणे कॅन्टोंन्मेंट 198, खडकी विभागातील 47, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 445, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील 56 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 26, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 218 व पुणे कॅन्टोंन्मेंट 29, खडकी विभागातील 26, ग्रामीण क्षेत्रातील 66, जिल्हा शल्य चिकित्सक 33 यांच्याकडील रुग्णांचा समावेश आहे.

तसेच 581 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 63.63 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 554 रुग्ण असून 1 हजार 370 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 1 हजार 96 आहे. कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 5 हजार 829 कोरोना बाधीत रुग्ण असून 2 हजार 872 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 2 हजार 578 आहे. कोरोना बाधित एकूण 379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 1 हजार 63 रुग्ण असून 439 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 590 आहे. कोरोना बाधित एकूण 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील 2 हजार 530 कोरोना बाधीत रुग्ण असून 1 हजार 47 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 423 आहे. कोरोना बाधित एकूण 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.