Pune Division corona Update : पुणे विभागातील 1.45 लाख रुग्णांची कोरोनावर मात

रविवारी आढळलेल्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत सोमवारी (दि.24) विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 3,396 वाढ झाली आहे .

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2,00,948 झाली आहे. विभागातील 1,45,719 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 49,848 आहेत. रविवारी आढळलेल्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत सोमवारी (दि.24) विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 3,396 वाढ झाली आहे .

पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2,00,948 झाली आहे. विभागातील 1,45,719 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 49,848 आहे.

विभागात कोरोना बाधीत एकूण 5,381 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के इतके आहे. पुणे विभागामध्ये बन्या होणाच्या रुग्णांचे प्रमाण 72.5 टक्के आहे.

रविवारी आढळलेल्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत सोमवारी (दि.24) विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 3,396 वाढ झाली आहे . त्यामध्ये पुणे जिल्हयात 2,351, सातारा जिल्हयात 443, सोलापूर जिल्हयात 294. सांगली जिल्हयात 174, कोल्हापूर जिल्हयात 134 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण 9,39,310 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला प्राप्त अहवालांपैकी 2,00,948 नमून्यांचा अहवाल सकारात्मक आले आहेत.

_MPC_DIR_MPU_II

 पुणे जिल्हा- कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1,47,392 झाली आहे. 1,12,648 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 31,237 आहे. पुणे जिल्हयात बाधीत एकुण 3,507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे.पुणे जिल्हयामध्ये बन्या होणार्या रुग्णांचे प्रमाण 76.43 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 157 रुग्णांपैकी 5 हजार 947 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 895आहे. कोरोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 16 हजार 59 रुग्णांपैकी 11 हजार 700 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 683 आहे. कोरोनाबाधित एकूण 676 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 615 रुग्णांपैकी 4 हजार 577 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 718 आहे. कोरोनाबाधित एकूण 320 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 725 रुग्णांपैकी 10 हजार 847 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 315 आहे. कोरोनाबाधित एकूण 563 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.