Pune Division Corona Update: पुणे विभागात कोरोनाचे 10 हजार 247 रुग्ण; त्यातील 5 हजार 635 जणांना डिस्चार्ज

Pune Division Corona Update: 10247 patients of Corona in Pune Division; 5635 of them were discharged कोरोनामळे विभागात 477 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे विभागात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 10 हजार 247 झाली आहे. त्यातील 5 हजार 635 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या 4 हजार 135 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. विभागात कोरोनाबाधीत 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 223 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कालच्या (सोमवार, दि. 1) बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 286 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 174, सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 43, कोल्हापूर जिल्ह्यात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 91 हजार 282 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 86 हजार 230 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 52 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 75 हजार 851 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 10 हजार 247 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

पुणे जिल्हा -पुणे जिल्हयातील 7 हजार 947 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 4 हजार 729 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 861 आहे. कोरोनाबाधित एकूण 357 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 205 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

सातारा जिल्हा –सातारा जिल्हयातील 573 कोरोना बाधीत रुग्ण असून 200 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 351 आहे. कोरोनाबाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा -सोलापूर जिल्हयातील 992 कोरोना बाधीत रुग्ण असून 446 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 458 आहे. कोरोना बाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा -सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 112 रुग्ण असून 65 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 43 आहे. कोरोना बाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा -कोल्हापूर जिल्हयातील 623 कोरोना बाधीत  रुग्ण असून 195 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 422 आहे. कोरोना बाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1