Pune Division Corona Update : पुणे जिल्ह्यातील 3.44 लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 60 हजार 758 झाली आहे. त्यापैकी 3 लाख 44 हजार 912 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत‌. जिल्ह्यात सध्या 7 हजार 161 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत‌‌.

जिल्हयात 8 हजार 685 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे हे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे. तर, ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.61 टक्के आहे.

पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 60 हजार 717 झाली आहे. विभागातील 5 लाख 35 हजार 744 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

विभागातील ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 396 आहे. विभागात 15 हजार 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के इतके आहे. पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.55 टक्के आहे.

कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 771 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 564, सातारा जिल्हयात 96, सोलापूर जिल्हयात 78, सांगली जिल्हयात 17, कोल्हापूर जिल्हयात 16 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकुण 32 लाख 60 हजार 972 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 60 हजार 717 नमून्यांचा अहवाल सकारात्मक आले (Positive) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.