Pune division corona update : पुणे विभागातील 4.89 लाख रुग्ण झाले बरे, रिकव्हरी रेट 94.29 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 18 हजार 757 एवढी झाली आहे. विभागातील 4 लाख 89 हजार 128 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात सध्या 15 हजार 7 सक्रिय रुग्ण असून, 14 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाण 2.82 टक्के इतके आहे. पुणे विभागामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.29 टक्के एवढे आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 31 हजार 777 झाली आहे. जिल्ह्यातील 3 लाख 14 हजार 447 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या 9 हजार 242 सक्रिय रुग्ण आहेत.

पुणे जिल्हयात कोरोना बाधीत एकुण 8 हजार 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.44 टक्के इतके आहे तर, पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.78 टक्के आहे.

कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधीत रूग्णाच्या संख्येमध्ये एकूण 523 ने वाढ झाली आहे त्यामध्ये पुणे जिल्हयात 359, सातारा जिल्हयात 42, सोलापूर जिल्हयात 83, सांगली जिल्ह्यात 28, कोल्हापूर जिल्हयात 11 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

विभागामध्ये सोमवारी (दि.16) बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 636 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयात 375, सातारा जिल्हयामध्ये 57, सोलापूर जिल्हयामध्ये 126, सांगली जिल्हयामध्ये 64 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 14 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत विभागात एकुण 25 लाख 98 हजार 703 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, त्यापैकी 5 लाख 18 हजार 757 नमून्यांचा अहवाल सकारात्मक आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.