Pune Division Corona Update : पुणे विभागातील 5.43 लाख बाधित रुग्ण कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 5 लाख 66 हजार 289 एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 5 लाख 43 हजार 187 रुग्ण बरे झाले आहेत. विभागात सध्या 7 हजार 393 एवढ्या सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे विभागाच्या सोमवारी (दि.4) पर्यंतच्या प्राप्त आवाहालानुसार, विभागात आतापर्यंत एकूण 15 हजार 709 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूचे प्रमाण 2.77 टक्के आहे. पुणे विभागात बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.92 टक्के आहे.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील एकूण 3 लाख 65 हजार 23 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 3 लाख 50 हजार 668 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात 5 हजार 592 ॲक्टीव रुग्ण आहेत. 8 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.07 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील एकूण 54 हजार 633 रुग्णांपैकी 52 हजार 231 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 632 ॲक्टीव रुग्ण आहेत. 1 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील एकूण 49 हजार 408 रुग्णांपैकी 46 हजार 745 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 931 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील एकूण 47 हजार 656 रुग्णांपैकी 45 हजार 733 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या 188 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 735 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील एकूण 49 हजार 569 रुग्णांपैकी 47 हजार 810 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात केवळ 50 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 709 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी (दि.3) बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 508 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 327, सातारा जिल्ह्यात 101, सोलापूर जिल्ह्यात 56, सांगली जिल्ह्यात 18 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 रुग्णांची वाढ झाली आहे.

दुसरीकडे बऱ्या होणा-या रुग्णांची संख्या 582 आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील 394, सातारा जिल्हयामध्ये 129, सोलापूर जिल्हयामध्ये 40, सांगली जिल्हयामध्ये 13 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागात आजपर्यत एकुण 33 लाख 58 हजार 662 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 66 हजार 289 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.