Pune Division Corona Update : पुणे जिल्ह्यात 5 हजार 57 सक्रिय कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 79 हजार 610 झाली आहे. त्यापैकी 3 लाख 65 हजार 581 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 5 हजार 057 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 4 रुग्ण नवीन कोरोना स्ट्रेनचे आहेत.

पुणे जिल्ह्यात एकूण 8 हजार 972 कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.30 टक्के आहे.

पुणे  विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 85 हजार 399 झाली आहे. त्यापैकी 5 लाख 62 हजार 708 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सध्या 6 हजार 636 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागात 16 हजार 055 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के इतके आहे तर, बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.12 टक्के आहे.

रविवारी (दि.31) रूग्ण संख्येत झालेल्या वाढीच्या तुलनेत सोमवारी (दि.1) पुणे विभागात बाधीत 379 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 253, सातारा जिल्ह्यात 66, सोलापूर जिल्हयात 39, सांगली जिल्हयात 8, कोल्हापूर जिल्हयात 13 अशी रूग्ण संख्येमध्ये बाट झालेली आहे.

विभागामध्ये सोमवारी (दि.1) रोजी ब-या होणा-या रुग्ण एकुण 527 आहेत. त्यामध्ये पुणे जिल्हयात 423, सातारा जिल्हयामध्ये 20, सोलापूर जिल्हयामध्ये 57, सांगली जिल्हयात 24 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 3 रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 37 लाख 18 हजार 615 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. पाप्त अहवालापैकी 5 लाख 85 हजार 399 नमून्याचा अहवाल सकारात्मक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.