शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Pune Division Corona Update : पुणे जिल्ह्यात 5,249 सक्रिय रुग्ण, 96.22 टक्के रिकव्हरी रेट

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 73 हजार 019 झाली आहे. त्यापैकी 3 लाख 58 हजार 908 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात 5 हजार 249 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये 4 नवीन स्ट्रेनच्या कोरोना बाधित रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकुण 8 हजार 862 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.22 टक्के आहे.

पुणे विभाग
पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 76 हजार 617 झाली आहे. विभागातील 5 लाख 53 हजार 771 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात 6 हजार 967 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 15 हजार 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के इतके आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.04 टक्के आहे.

कालच्या बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत आज विभागात बाधित रुग्णाच्या संख्येमध्ये एकूण 697 ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 499, सातारा जिल्ह्यात 71, सोलापूर जिल्ह्यात 103, सांगली जिल्ह्यात 16, कोल्हापूर जिल्ह्यात 8 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

विभागामध्ये रविवारी (दि.17) रोजी बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकुण 738 आहे . त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 581, सातारा जिल्ह्यामध्ये 61, सोलापूर जिल्ह्यामध्ये 66, सांगली जिल्ह्यामध्ये 24 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 35 लाख 31 हजार 262 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 76 हजार 617 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (Positive) आहे.

spot_img
Latest news
Related news