Pune Division Corona Update : विभागातील 5,54,398 रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 95.19 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 54 हजार 398 झाली आहे. त्यापैकी 5 लाख 27 हजार 741 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात सध्या 11 हजार 204 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे विभागातील 15 हजार 453 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील एकूण 3 लाख 55 हजार 842 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 3 लाख 38 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात सध्या 8 हजार 782 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. जिल्ह्यात 8 हजार 603 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.11 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील 53 हजार 595 कोरोना रुग्णांपैकी 50 हजार 965 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात 883 सक्रिय रुग्ण आहेत तर, 1 हजार 747 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील 48 हजार 213 रुग्णांपैकी 45 हजार 339 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 193 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील 47 हजार 376 रुग्णांपैकी 45 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 261 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील 49 हजार 372 रुग्णांपैकी 47 हजार 591 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 85 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 696 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 878 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 668, सातारा जिल्ह्यात 88, सोलापूर जिल्ह्यात 105, सांगली जिल्ह्यात 14 तर कोल्हापूर जिल्ह्यात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. दुसरीकडे विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 44 आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 671, सातारा जिल्ह्यामध्ये 174, सोलापूर जिल्ह्यामध्ये 160, सांगली जिल्ह्यामध्ये 33 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकूण 31 लाख 59 हजार 987 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 54 हजार 398 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.