Pune Division Corona Update : पुणे विभागातील साडे पाच लाख रुग्ण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील एकूण 5 लाख 72 हजार 856 रुग्णापैकी 5 लाख 49 हजार 915 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. विभागात सध्या 7 हजार 117 एवढ्या सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागाचा कोरोना रिकव्हरी रेट सुधारला असून तो 96 टक्के एवढा आहे.

पुणे विभागात एकूण 15 हजार 824 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.76 टक्के आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा –
पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 लाख 70 हजार 228 झाली असून, त्यापैकी 3 लाख 55 हजार 988 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात 5 हजार 410 सक्रीय रुग्ण आहेत. जिल्ह्यात 8 हजार 830 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर, बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.15 टक्के आहे.

सातारा जिल्हा –
सातारा जिल्ह्यात 55 हजार 87 एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 52 हजार 626 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 672 आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 हजार 789 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा –
सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची सेख्या 50 हजार 18 झाली आहे. त्यापैकी 47 हजार 490 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात 773 सक्रिय रुग्ण आहेत. 1 हजार 755 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा –
सांगली जिल्ह्यात 47 हजार 834 एकूण रुग्णांपैकी 45 हजार 882 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 214 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 738 रुग्णांचा जिल्ह्यात आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा –
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49 हजार 689 झाली असून, त्यापैकी 47 हजार 929 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या 48 आहे. आजवर 1 हजार 712 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुणे विभागात कालच्या (दि.11) बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत मंगळवारी (दि.12) बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 650 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 502, सातारा जिल्ह्यात 34, सोलापूर जिल्ह्यात 70, सांगली जिल्ह्यात 19 तर कोल्हापूर जिल्ह्यात 25 अशी रुग्णांची वाढ झाली आहे.

पुणे विभागात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या 730 आहे. पुणे जिल्ह्यात 576, सातारा जिल्ह्यात 34, सोलापूर जिल्ह्यात 85, सांगली जिल्ह्यात 19 व कोल्हापूर जिल्ह्यात 16 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागात आजपर्यत एकूण 34 लाख 72 हजार 743 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 72 हजार 856 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.