Pune Division Corona Update : पुणे विभागात कोरोना बधितांची संख्या दोन लाखांच्या घरात

पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील कोरोना बधितांची संख्या दोन लाखांच्या घरात गेली आहे. विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 97 हजार 552 झाली आहे. त्यातील 1 लाख 41 हजार 897 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 50 हजार 412 इतकी आहे. कोरोना बाधीत एकुण 5 हजार 243 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.72 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 71.8 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

रविवारी (दि. 23) रात्री 9 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 9 लाख 24 हजार 574 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 97 हजार 552 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 197 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 580, सातारा जिल्ह्यात 345, सोलापूर जिल्ह्यात 271, सांगली जिल्ह्यात 146 तर कोल्हापूर जिल्ह्यात 855 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 45 हजार 41 रुग्णांपैकी 1 लाख 10 हजार 291 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 हजार 334 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 416 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 76.04 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 9 हजार 714 रुग्णांपैकी 5 हजार 707 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 701 आहे. कोरोनाबाधित एकूण 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 15 हजार 765 रुग्णांपैकी 11 हजार 375 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 725 आहे. कोरोनाबाधित एकूण 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 8 हजार 441 रुग्णांपैकी 4 हजार 458 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 674 आहे. कोरोनाबाधित एकूण 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 18 हजार 591 रुग्णांपैकी 10 हजार 66 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 978 आहे. कोरोनाबाधित एकूण 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.