Pune division corona update : पुणे विभागात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.94 टक्के

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 5 लाख 20 हजार 855 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 लाख 48 हजार 590 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्णसंख्या 12 हजार 402 इतकी आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

शनिवारी (दि. 12) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकूण 30 लाख 57 हजार 359 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 48 हजार 590 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये 955 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 761, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 129, सांगली जिल्ह्यात 35 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत एकूण 3 लाख 51 हजार 584 रुग्णांपैकी 3 लाख 33 हजार 759 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 94.93 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 53 हजार 34 रुग्णांपैकी 50 हजार 174 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 116 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 47 हजार 473 रुग्णांपैकी 44 हजार 392 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 425 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 656 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 47 हजार 232 रुग्णांपैकी 45 हजार 125 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 385 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित एकूण 49 हजार 267 रुग्णांपैकी 47 हजार 405 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 171 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 691 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.