Pune Division Corona Update :  विभागात 95.03 टक्के रुग्ण कोरोनमुक्त; 11 हजार 984 ॲक्टिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 5 लाख 22 हजार 748 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 50 हजार 94 झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 11 हजार 984 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 362 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.03 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

सोमवारी (दि. 14) रोजी रात्री नऊ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 83 हजार 948 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 50 हजार 94 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 654 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 475, सातारा जिल्ह्यात 83, सोलापूर जिल्ह्यात 65, सांगली जिल्ह्यात 19 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 52 हजार 707 रुग्णांपैकी 3 लाख 35 हजार 154 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 9 हजार 14 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.02 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 172 रुग्णांपैकी 50 हजार 261 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 167 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 649 रुग्णांपैकी 44 हजार 647 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 268 रुग्णांपैकी 45 हजार 209 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 337 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 298 रुग्णांपैकी 47 हजार 477 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 129 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.